Category: फोटोगैलरी

दुर्गाबाई डोह यात्रेला भाविकांची गर्दी….

साकोली : तालुक्यातील कुंभली येथील दुर्गाबाई चा डोह यात्रेला सुरूवात झाली असुन यात्रेमध्ये भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे.यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने सजली असुन यात्रेकरूंच्या सोयीकरीता प्रशासनाच्या वतीने विशेष सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. तिन दिवस चालणाºया या यात्रेमध्ये मध्य प्रदेश,छत्तीसगड व विदर्भातुन मोठया संख्येने भाविक येत असतात. (छाया-नाझीम पाशाभाई,साकोली)

Continue Reading

‘वेध मकरसंक्रांतीचे’

मोहाडी : येथील बसस्थानक समोरील चंदुबाबा क्रिडांगणावर मकरसंक्रांतीनिमित्त स्व.अजय गायधने स्मृतीप्रित्यर्थ ‘सबसे बडा पतंगवान-२’ स्पर्धांसाठी विविधांगी पतंगाची दुकाने मेनरोडच्या बाजुला सजलेली असल्याचे विहंगम दृष्य. (छाया : यशवंत थोटे, मोहाडी)

Continue Reading

सिताफळ

भंडारा: थंडीचा मोसमाला सुरूवात झाली असून सिताफळांची घात शेवटच्या टप्प्यात असल्याने मुस्लिम लायब्ररी चौकातील दुकानाकडे ग्राहकांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसून येत आहे़ (छाया : यशवंत थोटे, मोहाडी)

Continue Reading

चला…’शेकोटी’ पेटवू या…!

मोहाडी : परिसरात थंडीचे दिवस असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपविभागीय कार्यालयासमोर शेतकरी कुटुंब शेकोटी पेटवून ऊब घेतांना टिपलेले चित्र… (छाया : यशवंत थोटे, मोहाडी)

Continue Reading

फळाला पान

मोहाडी : येथील टिळक वार्डातील रहिवासी तारा शालिक हेडाऊ यांच्या घरी असलेल्या पेरूच्या झाडावरील फळाला पान उगवल्याने कुतूहलाचा विषय ठरला असून परिसरातील नागरिकांनी पाहण्याकरिता गर्दी केली आहे़ (छाया : यशवंत थोटे, मोहाडी)

Continue Reading

सखी मतदार केंद्र

आदर्श मतदार केंद्र ग्रामपंचायत गडेगाव व सखी मतदार केंद्र मुरमाडी / सावरी येथे शांततेत पार पडली निवडणूक (छाया : नाझीम पाशाभाई)

Continue Reading

रांगोळयांचीरेलचेल

भंडारा : अवघ्या आठवडयावर आलेल्या दिवाळीच्या पार्श्वभुमीवर भंडारा शहरातील बाजारपेठवेगवेगळया रंगाच्या रांगोळयांनी सजलेल्या असून या आकर्षक रांगोळया घेण्यासाठी महिलांनीआतापासूनच बाजारात गर्दी केली आहे. बाजारात रांगोळीचे दुकान थाटतांना एक महिला दुकानदारदिसत आहे. (छाया: गोवर्धन निनावे,भंडारा)

Continue Reading

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती

भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुलकलाम यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी एम.जे. प्रदिप चंद्रन यांनी पुष्पहारअर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोंदवडव अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Continue Reading

स्वागत…

साकोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भंडारा-गोंदियाजिल्हयातील भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दि.१३ आॅक्टोंबर रोजी साकोली/सेंदु-रवाफा येथे सभा आयोजित करण्यात आली होती.आयोजित सभेमध्ये साकोली शहराचे प्रथम नागरीक नगराध्यक्षा धनवंता राऊत यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुष्प देवुन स्वागत केले. (छाया- नाझीम पाशाभाई, साकोली )

Continue Reading
देश दुनिया