Category: महाराष्ट्र

‘महापारेषण’ मध्ये होणार ८५०० पदांवर भरती

प्रतिनिधी मुंबई : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी धम्मचक्र प्रवर्तनाच्या पावन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधीच्या रूपात एक आगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास ८५०० तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज दिले. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याने हजारों तरुणांच्या […]

Continue Reading

पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये!

प्रतिनिधी मुंबई : अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील हरिसाल येथील दलित महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी घेतली आहे.या प्रकरणात अमरावती चे पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती त्यांनी घेतली व कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांना […]

Continue Reading

राज्य सरकारकडुन सीबीआयला लगाम

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्यात यापूढे आता सी.बी.आय.चौकशीसाठी राज्य सरकारची पूर्व संमती घेणे आता आवश्यक आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. याबाबतचे आदेश गृहविभागाने दि. २१/ आॅक्टोंबर २०२० रोजी निर्गमित केले असल्याचे सांगून त्यांनी या संदभार्तील अनुषंगिक माहिती दिली. त्यात प्रामुख्याने सांगितले, दिल्ली विशेष पोलीस अधिनियम, १९४६ ला अस्तित्वाला आला. […]

Continue Reading

कँपटीव्ह पॉवर प्रकल्पाचे वीज शुल्क कमी करण्याबाबत सरकार विचारधीन – डॉ. नितीन राऊत

प्रतिनिधी मुंबई : कँपटीव्ह पॉवर प्रकल्पाचे वीज शुल्क कमी करण्याबाबत अभ्यास करून सकारात्मक तोडगा काढला जाईल असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कँपटीव्ह जनरेशनच्या शिष्टमंडळाला आज दिले. कँपटीव्ह जनरेशनच्या वीज शुल्काच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महावितरणच्या फोर्ट येथील मुख्यालयात बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. कँपटीव्ह जनरेशनच्या या शिष्टमंडळाने त्यांच्यावर वाढलेला आर्थिक बोजा आणि त्यामुळे […]

Continue Reading

फडणवीसांनी माझे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला

प्रतिनिधी जळगाव : आज एकनाथ खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी खालच्या स्तरावर राजकारण केल असून त्यांनी जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असे एकनाथ खडसे म्हणाले. ‘मला काही मिळालं, नाही मिळालं, याचं दु:ख नाही. पण मला देवेंद्र फडणवीसांनी छळले आहे. माझा आजही भाजपवर […]

Continue Reading

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई: इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षांचा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नोव्हेबंर व डिसेंबर महिन्यात या दोन्ही इयत्तांच्या फेरपरीक्षा पार पडणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे यासंदर्भात परित्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२० च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण […]

Continue Reading

मुंबई वीज पुरवठा ठप्प होण्यावरून राज्य सरकारने नेमली चौकशी समिती

प्रतिनिधी मुंबई : मुंबई आणि एम एम आर परिस- राचा वीज पुरवठा ठप्प होण्यावरून ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले. या प्रकरणी तांत्रिक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून दोषींवर कठोर का- रवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या समितीला आठवडाभरात आपला अहवाल द्यायला सांगण्यात आले […]

Continue Reading

स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या मागण्या प्राधान्याने मान्य कराव्यात : नाना पटोले

प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांच्या आणि वारसदा- रांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून पुढील एक महिन्यात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाºयांना आज दिले. विधानभवन येथे राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि त्यांच्या पाल्यांच्या, कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामान्य […]

Continue Reading

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा

प्रतिनिधी/भं.प. मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्था नष्ट झाल्याने स्त्रिया व अनुसूचित जातीच्या लोकांविरुद्ध अत्याचार व हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊजार्मंत्री डॉ नितीन राऊत यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. आज […]

Continue Reading

कोरोनाचा लढा निर्णायक वळणावर

प्रतिनिधी मुंबई: राज्यात करोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. करोनाचे रुग्णांची संख्या कमी होत आहे तर, रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. महाराष्टाचा करोनाचा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाज्मा थेरपीसाठी अफेरेसिस युनिटचे दूरदृष्य […]

Continue Reading
देश दुनिया