‘कृषी पायाभूत सुविधां’ साठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद

प्रतिनिधी नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या तिस-या टप्प्याची आज घोषणा झाली. यामध्ये अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींबाबत माहिती दिली. यांपैकी एक घोषणा म्हणजे, ‘अ‍ॅग्री इन्फ्रा फंड’ म्हणजेच, कृषी पायाभूत सुविधांसाठी सरकारने तब्बल एक लाख कोटींची तरतूद केली आहे. या निधीचा वापर हा कोल्ड चेन्सच्या निर्मितीसाठी आणि कापणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणा-या मूलभूत सुविधांसाठी केला जाणार आहे, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. यासोबतच, मायक्रो फूड एन्टरप्रायजेस (एमएफई)च्या औपचारीकरणासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. याचा फायदा दोन लाख एमएफईंना होणार आहे.

शेतमाल त्याची वाहतूक आणि साठवण यासाठी आवश्यक पायाभूत सेवा सुविधांच्या विकासासाठी १ लाख कोटींची घोषणा, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी २०००० कोटी, तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यात करण्यात येणा-या सुधारणा ह्यामुळे कृषी बाजारपेठेतील दलालांची साखळी मोडीत निघण्याची शक्यता आहे. एकूणच शेतकरी, मच्छीमारांना आत्मनिर्भर करण्यासाठी ह्या योजना उपयुक्त ठरणार आहेत

.- खा. सुनील मेंढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *