२५ मे पासून देशातंर्गत हवाई वाहतूक सेवा सुरू होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : करोनाच्या प्रादुर्भाव झाल्यानं केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसह देशातंर्गत विमान वाहतूक सेवा बंद केली होती. मागील दीड महिन्यांपासून जास्त काळ विमान सेवा बंद आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं लॉकडाउनला ३१ मे पर्यंत मुदतवाढ देताना अनेक बाबींमध्ये शिथिलता आणण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे हवाई वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर केंद्रानं विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी याविषयीची माहिती दिली. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशाच्या सीमा बंद करण्याबरोबच राज्यांच्या सीमाही बंद केल्या होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीबरोबर देशातंर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय केंद्रानं करोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला होता. अखेर लॉकडाउनचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टप्प्याच्या अखेरीस विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *