आधार अपडेट संबंधात आयुक्तासोबत चर्चा करणार – विक्रम काळे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : स्टूडेंट्स पोर्टलवर आधार कार्ड वैध होण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे शिक्षकांची पदे कमी होत आहेत. याबाबत आयुक्त पुणे यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल असे मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितले. आमदार विक्रम काळे यांच्या राज्य पथकाने भंडारा जिल्ह्यातील दहावीच्या भूगोल विषयाच्या पेपरच्या दिवशी भंडारा, मोहाडी, तुमसर आदी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. भेटीनंतर भंडारा येथील विश्रामगृहात त्यांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चा केली. विश्रामगृहात विविध संघटनेच्या पदाधिकाºयांनी आमदार विक्रम काळेयांचे स्वागत केले.

यावेळी अंशत: अनुदानीत शाळांना सरसकट शंभर टक्के अनुदान मिळावा, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक, रजा रोखीकरण, वाढीव महागाई भत्ता देयके, सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता, नियमित वेतन देयके एक तारखेला अदा करणे आदी विषयाबाबत संघटनेच्या पदाधिकाºयांनी आमदार विक्रम काळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक)संजय डोर्लिकर यांनी जिल्हा स्तरावरील अडचणी तात्काळ सोडविण्यात येतील असे सांगितले. शाळांना मिळणारा अनुदान कमी येत असते याबाबत संचालकांशी चर्चा केली जाईल असे आमदारांनी सांगितले.

१५ एप्रिल पर्यंत वैद्यकीय देयक मिळणार

वैद्यकीय देयके अनेक दिवसांपासून वेतन पथकात पडून आहेत. नियमित वेतन देयके तसेच वैद्यकीय देयकांसाठी अनुदान प्राप्त झाला आहे. शिक्षणाधिकारी व वेतन पथकातून पूर्ण प्रक्रिया झाली आहे. १५ एप्रिल पर्यंत सर्वं देयक पारित करण्यात येणार असल्याचे वेतन पथक अधिक्षक आशिष चव्हाण यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.