महाराष्ट्रासाठी रोज १२५ श्रमिक ट्रेन सोडण्यास तयार!

वृत्तसंस्था नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. महाराष्ट्रासाठी रोज १२५ ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे मजु- रांची यादी द्या, असं पियुष गोयल यांनी ट्विट करून म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी रेल्वेकडून पुरेशा गाड्या मिळत नसल्याचं सांगितलं. आपण स्थलांतरीत मजु- रांसाठी रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात आपल्याला रेल्वेकडून फक्त ४० ट्रेन मिळत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *