निलज खुर्द येथील शासकिय जागेवरील अतिक्रमणासाठी गावकºयाच आमरण उपोषण सरु

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द येथे काही धार्मिक लोकांनी अतिशय मोक्याच्या शासकीय जागेवर धार्मिक कार्यासाठी अतिक्रमण करून विनापरवानगीने बांधकाम सुरू केले आहे. तंटामुक्त गाव समिती व ग्रामस्थांनी २७ जानेवारी २०२२ रोजी अतिक्रमण काढण्यासंबंधीचे अर्ज ग्राम पंचायत प्रशासन, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस विभागास दिले होते. परंतु, संबंधित विभागाने तसेच ग्रा.पं.प्रशासनाने अतिक्रमण हटविले नसल्याने प्रशासनाच्या निष्क्रीय घोरणांमुळे निलज येथील संपूर्ण गावकºयांनी ग्रा.पं. प्रशासनाच्या विरोधात सोमवारला सकाळी १० वाजतापासून ग्राम पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले आहे.

मोहाडी तालुक्यातील मौजा निलज खुर्द येथे शासकीय मैदान ७/१२ सर्व्हे क्रमांक ४४ या जागेवर रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने मैदान सपाटीकरणाचे अकुशल काम २०२० मध्ये झाले होते. तसेच ही जागामैदानाकरिता ग्रामपंचायत स्तरावर राखीव आहे. नुकतेच रोहयो अंतर्गत कुशल स्वरूपाची मुरूम कामे प्रस्तावित आहेत. परंतु, गावातील काही धार्मीक मंडळींनी कुठलीही प्रशासनाची परवानगी न घेता जाणीवपूर्वक या जागेवर अतिक्रमण केले व धार्मिक कार्यासाठी मनमर्जीने त्या जागेवर बांधकाम सुरु केले आहे. मात्र, ती जागा खेळाडू तसेच गावातील कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आलेली असूनही या जागेवर काही माथेफिरु लोकांनी धार्मीक कार्यासाठी अतिक्रमण केल्यामुळे गावकºयांनी शासनाकडे तक्रारीवजा निवेदन दिले होते.

तसेच अतिक्रमणामुळे गावात शांतता भंग होण्याची व पुढील काळात जागेचागैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा आशयाचे पत्र यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनास देण्यात आले. मात्र त्या तक्रारीकडे ग्राम पंचायत प्रशासनाने कानाडोळा करुन अतिक्रमणधारकांवर अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही, अतिक्रमण काढण्यात आलेले नसल्याने निलज खुर्द येथील संपुर्ण गावकºयांनी सोमवार दि. २७ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता पासून आमरण उपोषण सुरु केले असून जोपर्यंत अतिक्रमण काढण्यात येणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच राहणार असल्याचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना आमरण उपोषणाचे हत्यार उपसावे लागले.

सदर उपोषणात माजी सरपंच भगवान आगासे, भगवान भोयर, बाबुराव बोंदरे, संजय भोयर, प्रकाश तितीरमारे, वंसतलाल बिल्लोरे, कुंडलिक मोहतुरे, दुर्गेश आगासे, संदीप भोयर, आदित्य बोंदरे, डेव्हिड आगासे, आशिष भोयर, सूचित मोहतुरे, राम बोंदरे, युवराज मोहतुरे, जैराम भोयर, इश्वर पिंगरे, संदीप उके, अनिल भोयर, विनोद मोहतुरे, माधोराव राखडे, सुभाष तितिरमारे, मोहन बोंदरे, विलास बांते आदींनी सहभाग उपोषणकत्यांचे म्हणणे आहे. घेतला आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमणधारकांनी जोमाने बांधकाम सुरू केल्याने ग्रामस्थांत ग्रा.पं. प्रशासनाविरोधात आक्रोशाची भावना आहे. तातडीने प्रशासनाने दखल घेत अतिक्रमण काढावे, अशी अपेक्षा असतांना ग्राम पंचायत प्रशासनाने याकडे अतिक्रमणासाठी आमरण उपोषण करण्यात येत असल्यामुळे यावर कोणती कार्यवाही करण्यात येईल यासाठी मोहाडी पंचायत समिती खंडविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

तक्रार प्राप्त झाली असुन ग्रामपंचायतच्या माध्यमातून शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याची रीतसर प्रक्रिया पोलीसांची कुमक बोलाऊन काढण्यात येईल.

दिपक करांडे, तहसीलदार, तहसील कार्यालय मोहाडी

प्रशासनाने अतिक्रमण तात्काळ काढावे

मोहाडी तालुक्यातील करडी लगत असलेल्या निलज (खुर्द) हे दीड हजार लोक वस्तीचे छोटेसे गाव आहे. या गावात अनेक मुले मुली खेळाच्या मैदानात आपले कौश्यल्य दाखऊन शासकिय नोकरीवर आहेत. या गावातील मुलांना खेळाची जिद्द आहे हे लक्षात घेऊन २०२० साली ग्राम पंचायतीने गट क्र.४४ वर रोजगार हमी योजने अंतर्गत माती टाकून नाला काठावरची जागा सपाट केली. माती काम झाले पण त्यावर कुशल काम होण्यास आहे (मुरूम टाकने) याच गट क्र.४४ वर काही धार्मीक लोकांनी अतिक्रमण करून भवन बांधत आहेत. यास गावातील लोकांचा विरोध आहे.

सुरू झालेले काम ग्रामसेवक प्रशासक तलाठी यांनी बंद केले. पण बंद केलेले काम वाटेल तेव्हा सुरू केले जाते. त्यामुळे दोन गटात वेळोवेळी शाब्दीक वाद होतो. हे अतिक्रमण काढावे यासाठी अनेक वेळा तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस विभागास पत्र देवून सुद्धा अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे निलज येथील लोकांनी दि.२७ मार्च पासून ग्राम पंचायतसमोर उपोषणावर बसले आहेत. निलज गाव वादग्रस्त गाव असून या गावात अनेक रक्त रणजित चकमकी झाल्या आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अतिक्रमण काढावे अशी मागणी आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.