लाखांदूर बनले सुगंधित तंबाखूंचे कोठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : अख्ख्या राज्यात सुगंधित तंबाखू व गुटखाबंदी असतांना लाखांदूर तालुक्यात बिनबोभाटपणे सुगंधित तंबाखाची व गुटख्याची खुलेआम विक्री योजनांना होत असून स्थानिक लाखांदूरातीलच तंबाखू किंग संपूर्ण तालुक्यातील चिल्लर विक्रेत्यांना सुगंधित तंबाखूचा पुरवठा होत असल्याची ओरड सध्या तालुक्यातील काही सुजाण नागरिक करित आहेत. भंडारा जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर लाखांदूर तालूका वसलेला असून सहा किलोमीटरवर गडचिरोली जिल्ह्याची विमा प्रारंभ होत असून तालुक्या पाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यातही सुगंधित तंबाखाची तसेच गुटख्याची तस्करी लाखांदूरातूनच होत असल्याचीही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र यासंबंधीत अन्न प्रशासन विभाग झोपेचे सोंग घेऊन सर्वकाही निमूटपणे बघत असल्याचीही ओरड आहे.

गत काही महिण्यापुर्वीच सदर तस्करीवर आळा घालण्याहेतू स्थानिक लाखांदूरातील एका दुकानावर धाडसत्र चालवित कारवाई केल्याचेही माहीती उघड आहे मात्र त्याहीवेळेला तस्कर सोडून सन्यासालाचा जेरबंद केल्याचे उघड असल्याने सध्या अन्न प्रशासन विभागावरही अविस्वास तालुक्यातील नागरीक दाखवित आहेत तर यात संबंधित विभागाची भूमिका संशयास्पद दिसते मात्र कारवाई करणार कोण असा सूर तालुक्यात झळकत आहे. प्रसार माध्यमातून अनेकदा चाललेल्या गैरप्रकारांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न सतत केला जात आहे मात्र कुंपणच शेत खात असल्याने कारवाईचा दणका पडताना दिसत नाही. सुगंधीत तंबाखाच्या व्यवसायातून लाखांदूरातील काही मोठे व्यापारी गब्बर झाले असून आमचं कोण काय वाकडे करणार या उर्मीत दिसून येत आहेत तालुक्याला सध्या सुगंधित तंबाखाचे कोठार संबोधणे ही वावगे ठरणार नाही. यात अन्न प्रशासन विभागाने गांभीर्य दाखवित उचीत कारवाईची मागणी सर्वत्र केली जात आहे.

कसा चालतो तस्करीचा प्रकार

तालुक्यातील गावात किराणा सामान काही किरकोळ दुकानदार यांना पोहचता करण्यासाठी ठोक विक्रेते आपल्या चारचाकी टेम्पो, ट्रकच्या माध्यमातून किराणा सामानाच्या मधोमध सुगंधित तंबाखू व गुटख्याची छूप्या मार्गाने तस्करी करीत असतात.

जादा पैसे कमविण्यासाठी कृत्रिम तुटवडा

वर्षातून दोनदा तालुक्यातील मोठ्या व्यावसायिकांकडून सुगंधित तंबाखू व गुटख्याचा कु्त्रिम तुटवडा निर्माण करून आपल्याच गोदामात तंबाखूचा साठा छपवून किरकोळ दुकानदारांकडून दुप्पट किमतीत त्याची विक्री करून जादा पैसे कमविण्याचा गोरखधंदा होत असतो.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.