तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यात अडकले होते महाराष्ट्रातील १३४९ नागरिक

प्रतिनिधी वर्धा : तामिळनाडू मधील ठेनी जिल्ह्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील १ हजार ३४९ व्यक्तीना घेऊन मदुराईहून निघालेली ट्रेन २५ मे रात्री उशिरा वर्धेत पोहचली. यामध्ये विदर्भातील १९२ नागरिक आले असून त्यांना रात्रीच एस टी महामंडळाच्या बसने त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यात आले. यामध्ये वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यातील विद्यार्थी, नोकरदार आणि कामगारांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी, नोकरदार व कामगार इतर राज्यात अडकले आहेत. त्यांना राज्य सरकारची परवानगी घेऊन महाराष्ट्रात आणण्यात येत आहे. तामिळनाडू राज्यातील थेनी जिल्ह्यात महाराष्ट्रतील १ हजार ३४९ नागरिक अडकले होते. यामध्ये पुणे विभाग ३०२, नाशिक विभाग १०१, मराठवाडा विभाग ७५४ तर विदर्भातील १९२ लोकांचा समावेश होता. त्यांना महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी मदु- राई येथून श्रमिक ट्रेन २३ मे रोजी रात्री १० वाजता निघाली.

ही ट्रेन २५ मे रोजी महा- राष्ट्रात पोहचली. पुणे, मनमाड, परभणी येथे या गाडीला थांबा देण्यात आला होता. नागरिकांना त्या- त्या थांब्यावर सोडत शेवटी ट्रेन वर्धेत विसावली. विदर्भातील १९२ लोकांना वर्धा रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. आलेल्या १९२ प्रवाशांमध्ये ७ बालकांचा समावेश होता. प्रवाशांची रेल्वे स्थानकावरच दोन आरोग्य पथकांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. या रेल्वेने आलेल्या नागरिकांना रात्रीच त्यांच्या जिल्ह्यात एस टी बसने पोहचविण्यात आले. यामध्ये अकोला – २, अमरावती – ३२, चंद्रपूर – २१, भंडारा- २५, गडचिरोली- २३, नागपूर – ३३, गोंदिया – ३३, यवतमाळ २ आणि वर्धा १४ नागरिकांचा समावेश होता. तर यासाठी महामंडळाच्या १० बसेसचा वापर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *