मत्स्य व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा – फुके

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मत्स्यव्यवसायात युवा पिढीने पुढाकार घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामुळे रोजगार निर्मिती होईल व समाजाचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले. वाकेश्वर येथे आयोजित एकलव्य ढिवर समाजबांधवांच्या प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. प्रसंगी एकलव्य यांच्या पूणार्कृती पुतळ्याचे अनावरण डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. पवनी तालुक्यातील वाकेश्वर १ एप्रिल रोजी एकलव्य ढिवर समाज आणि विकास मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या वतीने मत्स्य संस्थान प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्या उद्घाटन डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
प्रसंगी येथे एकलव्य यांच्या पूणार्कृती पुतळ्याचे अनावरण डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते १ एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिववलथरे, प्रकाश लोणारे, जिल्हा परिषद सदस्या अनिता भुरे, संस्थापक के.एन. नान्हे, संजय केवट, प्रकाश पचारे, चंद्रलाल मेश्राम, डॉ. उल्हास हरडे, शिवशंकर मुंगाटे, हेमंत बांडेबुचे, नितीन कडव, सुनीता मोहनकर, चतुर्भुज भानारकर, अजय मोहनकर, सुनील शिवरकर, गजानन बादशहा, विनोद मुरकुटे, यादव मेंगरे, बाबुलाल भोयर, चक्रधर पाखमोडे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.