विश्वविद्यालयाच्या विकासाकरीता सदैव प्रयत्न करणार : सुनिल केदार

प्रतिनिधी वर्धा : जिल्हयाचा पालकमंत्री या नात्याने जिल्हयाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी अनेक विकास कामे करण्यात येत आहेत. या विकासोबतच विश्वविद्यालयाच्या विकासाकरीता राज्य शासन सदैव प्ररत्नरत राहणार अशी हमी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिली. यावेळी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. विश्व हिंदी विद्यापिठाचे प्रकुलगुरु प्रो. हनुमान प्रसाद शुक्ल, प्रकुलगुरु प्रो. चंद्रकांत रागीट, शिक्षण विद्यापिठाचे अधिष्ठाता प्रो. मनोज कुमार, साहित्य विद्यापिठाच्या अधिष्ठाता प्रो. प्रिती सागर, कुलसचिव कादर नवाज उपस्थित होते.

यावेळी कादर नवाज खान यांनी विद्यापिठाला क्रिडा संकुल, गोशाळा आणि तलाव करुण देण्याची मागणी केली. विद्यापिठाच्या सर्व मागण्या थोडयाच दिवसात पूर्ण करण्याची हमी त्यांनी दिली. तसेच विद्यापिठांनी विद्यार्थ्यांच्या क्रिडा विषयक रुचीवर काम करावे. विकसित देशातील क्रिडा पटूंशी आपल्या देशातील क्रिडापटूंनी जिंकायचे असेल तर त्यांच्यावर योग्य काम विद्यापिठांनी करणे आवश्यक आहे. त्यांना तसे वातावरण उपलब्ध करुन देण्याची शासनाची जबाबदारी आहे. म्हणुन क्रिडामंत्री म्हणुन पहिल्यांदाच अर्थसंकल्पात महाराष्ट्रात स्वतंत्र क्रिडा विद्यापिठाचा प्रस्ताव मांडला आहे. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी सुनिल केदार यांनी महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयातील पाणी समस्या, उत्तम भारत अभियान अंतर्गत दहा गावामध्ये सुरु असलेली कामे, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त होणारे कार्यक्रम, कमवा आणि शिका योजना, वृक्षरोपन तसेच विद्यार्थ्याकरिता क्रिडाविषयक तसेच विद्यापिठातील सोयी सुविधा विषयी माहिती घेतली. विद्यापिठाव्दारे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमा विषयी समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या संकटात सर्वांनी सुरक्षितता बाळगावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. केदार यांनी विश्व विद्यापिठाच्या प्राद्यापक वर्गाशी चर्चा केली तसेच पक्षी तज्ञ अरण्यऋषी मारुती चित्तमपल्लीवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी सहाय्यक कुलसचिव राजेश अरोडा, डॉ. राजेश्वर सिह, ज्योतिष पायेंग व के.के. त्रिपाठी, विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *