वर्ध्यात पार्सल रेल्वेगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले

प्रतिनिधी वर्धा : मुंबईवरून चंद्रपूरच्या दिशेने जाणा- या पार्सल रेल्वे गाडीचे डबे वर्ध्यात घसरले. चौथ्या लूप लाईनवरुन घसरलेले हे डबे हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाकडे रेल्वे विभागाचे, जीआरपी आणि आरपीएफचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. वर्ध्यात पार्सल रेल्वेगाडीचे डबे रुळावरून घसरलेरेल्वे ट्रॅकला तडा गेल्याने हे डबे घसरल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. सुदैवाने ही प्रवासी ट्रेन नसल्याने मोठा अपघात टळला. इंजिनपासूनचा पाच आणि सहा हे दोन डबे रुळावरून घसरले आहेत. सध्या दोन्ही रेल्वे डबे वेगळे करून ट्रॅकची परिस्थिती तपासून रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना केली जाणार आहे. रात्री ९ वाजता हे क्रेन नागपूरवरून बोलावण्यात आले. याच्या मदतीने इंजिनला लागून असलेले चार डब्बे वेगळे करण्यात आले आहे. याच क्रेनच्या सहाय्याने घसरलेले डबे उचलून रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. रात्री उ-ि शरापर्यंत हे काम चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *