नरसिंह मंदिराच्या विकासासाठी आ. फुकेंना निवेदन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तुमसर-मोहाडी तालुक्याच्या सीमेवर देव्हाडा बु.येथे वैनगंगा नदीपात्रात लहानशा बेटावर श्रीक्षेत्र नरसिंह मंदिर व अण्णाजी महाराज समाधीस्थळ आहे. नदीकाठावरून मंदिरापर्यंत जाण्यायेण्याकरिता पुलाचे बांधकाम झाल्यास भाविकांची सोय होवून तीर्थक्षेत्राचा विकास होईल. यासंदर्भात विश्वस्त समितीच्या पदाधिकाºयांनी नागपूर येथे विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांना निवेदन देवून चर्चा केली. वैनगंगा नदी पात्रात असलेले हे एकमेव नृसिंह मंदिर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून ‘क’श्रेणीचा दर्जा प्राप्त असून विदर्भात मिनी पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे.
हे स्थळ वैनगंगा नदीपात्रात मध्यभागी टेकडीवर स्थित असून परिसर निसर्गरम्य व रमणीय आहे. या स्थळी संतहनुमानदास अण्णाजी महाराज यांची तपोभूमी असून या टेकडीवर महाराजांचे समाधी स्थळ आहे. भगवान नृसिंह हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे. नृसिंह मंदिर अगदी बोटावर मोजण्याइतके असून पर्यटन, देवदर्शन असा दुहेरी हेतू साध्य होतो; त्यामुळे या प्राचीन स्थळाचा समृद्ध विकास होण्याच्या दृष्टीने मंदिराचे व्यवस्थापक रंजन रवि ढोमणे व भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिवपंकज शेंडे यांनी तत्कालीन विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांची दि.२३ एप्रिल २०२२ ला दुपारी १२ वाजता भेट घेतली. यावेळी मंदिराच्या विकास आराखड्यासंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. विशेषता नदी काठावरून मंदिरापर्यंत जाण्या येण्याकरिता पुलाच्या बांधकामाची मागणी करण्यात आली होती.
पर्यटन व रोजगाराला मिळेल चालना
मंदिरापर्यंत पूल झाल्यास नदीतून चालत जाण्याचा भाविकांचा त्रास कमी होईल. विविध सोयी सुविधा उपलब्ध करता येतील. या मंदिराचा पर्यटन विकास झाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकेल. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
परिणय फुके यांचा केला गौरव
हिंदू नववर्षाच्या पावन पर्वावर विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल व पर्यटन क्षेत्र नरसिंह टेकडी मंदिर माडगी येथे विकासात्मक कामे मंजूर केल्याबद्दल परमपूज्य श्री संत हनुमानदासजी अण्णाजी महाराज ट्रस्ट माडगी जिल्हा भंडाराच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी नागपुर येथील कार्यालयात बुधवार दि.६ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ५ वाजता भेट घेत नूतनवर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि गौरवपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी ट्रस्टचे सचिव मदन शेंडे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम सेलोकर, संचालक रंजन ढोमणे, सदस्य पंकज शेंडे, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.