जिल्ह्यात ३ नवीन कोरोना रुग्णाची नोंद

प्रतिनिधी वर्धा : वर्धा जिल्ह्यात आज प्राप्त अहवालात आणखी ३ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. हे तीन रुग्ण वर्धमनेरी आणि सिंदी रेल्वे येथील रुग्णांच्या निकट संपर्कातील आहेत. वर्धमनेरी येथील ५९ वर्षीय पुरुषाच्या संपर्कातील पत्नी ४५ वर्ष आणि मुलगी २१ वर्ष या दोघींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सिंदी रेल्वे येथील कोरोना बाधित रेल्वे कर्मचाºयांच्या सोबत काम करणारे रामनगर र-ि हवासी ५९ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. आजच्या तीन कोरोना बाधित रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १३ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *