यवतमाळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १५८ वर

प्रतिनिधी यवतमाळ : महागाव येथील कारोनाबाधित मृताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकने भर पडली आहे. तर आज १ जण कोरोनामुक्त झाला आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला कोविड केअर सेंटर येथून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४ झाली होती. मात्र भरती असलेला एक जण ह्यपॉझिटिव्ह टू निगेटिव्हह्ण झाल्यामुळे त्याला वैद्यकीय महाविद्या लयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह पॉझेटिव्हचा आकडा पुन्हा ३३ झाला आहे.गत २४ तासात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण ८६ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक पॉझे-ि टव्ह तर उर्वरीत ८५ निगेटिव्ह आहेत. मंगळवारी महाविद्यालयाने ११३ नमुने तपासणीकरता पाठवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *