भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिवसेना तथा स्वराज्य युवा एकता फाऊंडेशन तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आंबेडकर स्मारक समिती सांस्कृतिक सभागृह, ई- वाचनालय तुमसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूणार्कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारताचे निमार्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण भारतातील नागरिकांना त्या त्या पद्धतीने न्याय दिलेला आहे. शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक सर्व बाजूने भारतीय नागरिकांना समान हक्क दिलेले आहे व भारताला चालविण्याकरता संविधानाच्या माध्यमातून मोठी घटना दिलेली आहे.
सर्वसामान्य लोकांना या घटनेत समान न्याय दिलेला आहे. या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच. मेश्राम, शाखा प्रमुख निखिल कटारे, पुष्पक त्रिभुवनकर, ईशान शेंदरे, स्वप्निल बडवाईक, धम्मदिप सूर्यवंशी, योगेश चिंधालोरे, रितेश शेंडे, निखिल कुंभलकर, सतिश वाकरकर, हेमंत नवखरे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.