श्रीराम शोभायात्रा समितीतर्फे भीम अनुयायांना जल वाटप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : श्रीराम शोभायात्रा समितीतर्फे डॉ.आंबेडकर जयंती निमित्त भीम अनुयायांना शितल जल वाटप करण्यात आले. भंडारा शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १४ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सायंकाळी शहरातील मुख्य मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली होती.या शोभायात्रेत सहभागी भीम अनुयायांकरिता श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रेच्या मार्गात मेनरोडवर स्टॉल लावून श्रीराम शोभायात्रा समितीच्या पदाधिकाºयांनी हजारो भीम अनुयायांना शितल जल वाटप करून त्यांची तृष्णा भागविली. प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष हेमंत आंबेकर यांच्यासह रामकृष्ण बिसने, पंकज हाडगे, राजू भोजवानी, संतोष त्रिवेदी, धनंजय ढगे, मुकूंदा पांढरीपांडे, अमित गि-हेपुंजे, हर्षल जावळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.