प्रवेश भरतीसाठी खाजगी शाळांचे सायकलींचे आमिष

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : खाजगी शाळा इ. ५ वी व ८ वी प्रवेश भरतीसाठी गरिब व भोळ्याभाबड्या पालकांना सायकलींचे व पैशाचे आमीष दाखवून आपल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. पालकांनी अशा कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता आपल्या पाल्यांच्या गुणवत्तेचा विचार करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद हायस्कुल नाकाडोंगरी शाळेचे मुख्याध्यापक के. एस. इनमुलवार यांनी केले आहे. जि. प. हाय. नाकाडोंगरी येथे हेल्थकेअर व इलेक्ट्रॉनिक्स हे दोन नविन विषय असून त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा भविष्यात फायदा होतो. हे विषय खाजगी शाळेत उपलब्ध नसतात. तसेच एनएमएस, नवोदय, शिष्यवृत्ती, स्पर्धा परिक्षा इ. चे अतिरिक्त वर्ग, सुसज्ज संगणक लॅब, क्रिडासाहित्य, प्रशस्त खेळाचे मैदान, प्रशिक्षित शिक्षक वर्ग इत्यादी सुविधा जिल्हा परिषद शाळेत उपलब्ध असून पालकांनी आपल्या पाल्याचे नाव या शाळेत अवश्य भरती करण्याचे आवाहन जिल्हा परिषद हायस्कुल नाकाडोंगरी शाळेचे मुख्याध्यापक के. एस. इनमुलवार यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.