बीआरएस हे राजकारण नसुन विकासाचे मिशन – चरण वाघमारे

प्रतिनिधी भंडारा : बीआरएस हे राजकारण नसुन विकासाचे मिशन आहे. याच माध्यमातुन आज बीआरएसचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मागील ९ वर्षात तेलंगाणाला एक विकासाचे मॉडल म्हणुन पुढे आणले आहे. बीआरएसे हे प्रत्येक घटकासाठी काम करीत असुन शेतकरी हा विकासाचा केंदबिंदु आहे. त्यामुळेच ‘अबकी बार, किसान सरकार’ चा नारा देणाºया भारत राष्ट्र समिती पक्षात आपण सामील झालो असल्याचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेत सांगीतले. पुर्वी तेलंगना राज्य शेतकरी आत्महत्येकरीता ओळखले जायचे मात्र नऊ वषापुर्वी तेलंगना राज्यात केसीआर यांचे भारत राष्ट्र समितीचे सरकार येताच त्यांनी शेतकरी हिताच्या अनेक योजना आखून त्याची अंमलबजाणी केल्याने आज तेलंगनातील शेतकरी आत्महत्याब-याअंशी थांबल्या आहे.

तलंगना राज्यात शेतकरी विमा योजनेअंतर्गत मृत्यू पश्चात अवघ्या आठ दिवसात मदत दिली जात असुन शेतकºया’ना एकरी दहा हजार रुपए अनुदान दिले जाते, शेतकºयांना शेतीउपयोगी साहित्य खरेदी करण्याकरीता ९० टक्के अनुदान दिले जात असुन २४ तास शेतीला मोफत वीज पुरवठा केला जातो. तेलंगना सरकारने राज्यातील १०० टक्के शेती सिंचनाखाली आणली असुन लिμटच्या माध्यमातुन दोन हजार किमी पर्यंत शेतीला पाणी पोहचविले जाते तेही निशु:ल्क यासह केसीआर सरकारने दलीत बंधु योजना, प्रत्येकघरी नळ व नळांना शुध्द पाणी योजना यासह जवळपास ४५० विविध प्रकारच्या योजना आखल्या असुन त्याची ‘मिशन मोड’ अमलबजावणी सुरू असल्याचे चरण वाघमारे यांनी यावेळी सांगातले. बीआरएस हे विकासाचे राजकारण असुन तेलंगणा सरकार च्या विकासाच्या लोककल्याणकारी योजना महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचविण्याकरीता येत्या ७ मे ते ७ जुन पर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात २८८ विधानसभा क्षेत्रात बीआरएस पक्षाच्या विकास कामांचा प्रचाररथ फिरणार आहे. व त्यामाध्यमातुन बीआर ची सदस्य नोंदणी अभियानसुध्दा राबविली जाणार आहे.

तुमसर विधानसभा क्षेत्रातील ३५६ बुथमध्ये ही सदस्यनोंदणी केली जाणार असुन आगामी नगर परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुका बीआरएस लढणार असल्याचे चरण वाघमारे यांनी यावेळी सांगीतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.