५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : चोवा येथे ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मित्रपरिवारानी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन धनंजय तिरपुडे, माजी सभापती कलाम शेख, तुमसर तालुका अध्यक्ष उमेश कटरे, तान्हा बावणकर, बन्शी नागपुरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी समर्पण रक्त पेढ़ी भंडाराच्या चमुने रक्त संकलन केले.

कार्यक्रमाला भाऊ कातोरे, जयश्री बोरकर काँग्रेस महिला अध्यक्ष, प्रविण उदापुरे, संजय चौधरी, बालू ठवकर, जगदीश उईके, राजु हलमारे, अभय राउत, अमोल लांजेवार, वामन शहारे, गंगाधर बोरकुटे, भैय्या चौधरी, राधे भोंगाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पूजा ठवकर, स्वप्निल आरीकर, अंकित शहारे, गजानन कहालकर, पंकज बोरीकर, राहुल शहारे यांनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.