शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पाहोचविण्यासाठी अधिकाºयांनी प्रयत्न करावे : विवेक भीमनवार

प्रतिनिधी वर्धा : धार्मिक, सामाजिक परंपरेचा बिमोड करून शाहू महाराज यांनी शिक्षणाचा प्रसार करून जनतेला शिक्षित केले. समान न्याय देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरु केल्यात. हेच ध्येय ठेऊन शासन सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवित आहे. या शासकिय योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कर्मचाºयांनी करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात केले. सामाजिक न्याय भवन येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्यकार्यकारी अधिका- री सचिन ओम्बासे, सहाय्यक आयुक्त अनिल वाळके, जात पडताळणी उपआयुक्त सुरेंद्र पवार, संशोधन अधिकारी गौतम वाकोडे यांची उपस्थिती होती. सामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहचविण्यासाठी अधिकाºयांनी अभ्यास करुन योग्य लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचेल या पध्दतीने काम करावे.

योजनेचा लाभार्थी आपल्या पर्यंत येण्यापेक्षा आपण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास योजनेचा खरा लाभ लाभार्थ्यांना होईल. शाहू महाराजाचे विचार आजच्या पिढींनी आत्मसात करण्याची गरज आहे. आज आपण ज्या योजना राबवतो त्या १५० वर्षांपूर्वी आखणी व नियोजन करून महाराजानी राबविल्या. सध्या जगावर कोरोना प्रादुर्भावाचे संकट कोसळले आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आपला जिल्हा यशस्वी होत आहे. असेच सातत्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी कोरोना योध्दा म्हणुन कामे करावी. पुढील काळातही जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही भीमनवार यांनी केले. दलित, पीडीत, शोषित समाजाच्या शिक्षणासाठी शाहू महाराजांनी काम केले.

सर्व प्रथम आरक्षण, पाणी टंचाई साठी धरण, लोककला व संस्कृती जपण्याचे काम शाहू महाराजांनी केले. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आजचे राज्यकर्ते मार्गक्रमण करीत आहेत. असे ओम्बासे म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बचत गटांना मिनी टॅक्टरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या महिला, समाजिक न्याय विभागाचे कर्मचारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्या लयाचे प्राचार्य डॉ. मिलींद सवाई, शाळेचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *