वादळी तडाख्यात निवारा हरपलेल्या वृद्ध महिलेला आ. वडेट्टीवारांकडून मदत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी ब्रम्हपुरी : शहरातील गांधीनगर येथे सिताबाई जयगुरू वानखेडे (वय ७० वर्ष) ही वयोवृध्द महीला आपल्या एका अपंग लेकीसह मोडकळीस आलेल्या घरात राहते. सिताबाई ह्या वयोवृद्ध असल्याने त्यांना कष्टाची कामे जमत नाही. तर त्यांची मुलगी ही लहानपणापासून दोन्ही पायांनी अपंग असल्याने तीला सुध्दा काम करता येत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही मायलेकी कसेबसे दिवस काढत आहेत. तेवढ्यातच आता अवकाळी पावसाने कहर केला असुन एकदिवसाआड पाऊस पडतोय.

अशातच या अवकाळी मुसळधार पावसाच्या तडाख्यात वयोवृद्ध महिलेचा घर कोसळला. त्यामुळे डोक्यावरचे छतही हरपल्याने वयोवृद्ध महिला व तीची मुलगी विवंचनेत सापडल्या होत्या. मात्र त्या महीलेला अशा परिस्थितीत आठवन झाली ती आमदार विजयवडेट्टीवार यांची. वयोवृद्ध महीलेने ऐकले होते की आमदार विजय वडेट्टीवार हे अडचणीत सापडलेल्यांना नेहमीच मदतीचा हात देत असतात. मदतीच्या अपेक्षेने त्यांच्या दाराशी आलेला कुणीही व्यक्ती कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. म्हणून त्यांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांचे ब्रम्हपुरी येथील घर गाठले आणि आमदार वडेट्टीवार यांना आपली आपबिती सांगितली. वयोवृद्ध महीलेची आपबिती मोठ्या आस्थेने ऐकुन घेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी लगेच सदर महीलेला आर्थिक मदत दिली. व तात्काळ संबंधित अधिका-यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत सदर महीलेचे घरकुल योजनेत नाव समाविष्ट करण्यासंदर्भात सांगितले.

यापुढेही आपण सर्वतोपरी आपल्या पाठीशी उभे असल्याचेही त्या महीलेला सांगितले. त्यानंतर नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार यांनाही मदत करण्यास सांगितले असता विखार यांनी देखील वयोवृद्ध महिलेच्या घरी जात कोसळलेल्या घराची पाहणी केली. व आर्थिक मदत दिली. वयोवृद्ध महीलेने देखील मदतीबाबत समाधान व्यक्त करीत आशिर्वाद रूपी शब्दात यावेळी व्यक्त झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.