राज्यात पुन्हा लॉकडाऊन नाही-आरोग्यमंत्री

प्रतिनिधी पुणे: ‘राज्यात यापुढे पुन्हा ‘ लॉकडाऊन ‘ होणार नाही तर ‘ अनलॉक ‘च असेल’ असे स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात दिले. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन अशा ‘ ए स् ा ए म् ा ए स् ा ‘ प् ा ्र ण् ा ा ल् ा ी स् ा ो ब् ा त् ा च् ा आपल्याला जगावे लागणार आहे, असे टोपे यांनी नमूद केले. राज्यात चाचण्या होत नाहीत, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून देशाचा विचार केला तर पुण्यात आणि मुंबईत सर्वाधिक चाचण्या होत आहेत. मृत्यूदरही लपवला जात नसून सरकारकडून खरी माहिती जाहीर केली जात असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. जुलै, आॅगस्ट महिन्यांत करोना रुग्णांचा आकडा वाढू शकतो. त्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात आहे. मात्र, लॉकडाऊन राहणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *