आज २ रूग्ण झाले कोरोनामुक्त

प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण उपचारातून बरे होऊन घरी जात आहे.आज २६ जून रोजी आणखी दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता केवळ दोनच कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहे. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथे राहून तिथल्या महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील एका उद्योग कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणारा व्यक्ती किडनीच्या आजारावरी ल उपचारासाठी २४ जून रोजी नागपूर येथे खाजगी रुग्णालयात भरती झाला होता.२५ जून रोजी त्याची प्रकृती ढासळली.याच दिवशी त्याची कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.आज २६ जून रोजी त्याचा मेयो रुग्णालय नागपूर येथे सकाळी ७:४५वाजता मृत्यू झाला. विशेष म्हणजे या रुग्णाला किडनीच्या आजारासोबतच मधुमेह व उच्च रक्तदाब हा देखील आजार होता.

आज २६ जून रोजी जिल्ह्यात नवा बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.आज आणखी २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत १०२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. तर केवळ २ कोरोना क्रियाशील रुग्ण उपचार घेत आहे. आज जे २ रुग्ण कोरोनामुक्त झाले ते गोंदिया तालुक्यातील असून ते २० ते २५ वर्ष वयोगटातील आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने कोरोनाचा संसर्ग आपणाला होऊ नये यासाठी स्वत: च्या आरोग्याची काळजी घ्यावी.अत्यावश्यक कामाशिवा य घराबाहेर पडू नये.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रत्येकाने शा- रीरिक अंतर राखावे.वारंवार हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावे. कोणत्याही वस्तूला हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवावे.हाताला सॅनिटायझर लावावे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तोंडावर आणि नाकावर मास्क किंवा रुमालचा वापर करावा.

सर्दी,ताप किंवा खोकला असल्यास नजीकच्या दवाखान्यात किंवा फिव्हर क्लीनिकमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी. जिल्ह्यात आतापर्यंत १०५ कोरोना बाधित रुग्ण आढळले. १०२ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात क्रियाशील कोरोना रुग्णांची संख्या आता केवळ २ इतकी आहे.तर नागपूर येथे कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णाचा नागपूर येथे आज मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *