केशकर्तनालये शासनाच्या आदेशाच्या आधीन राहून सुरू

यशवंत थोटे मोहाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केशकर्तनालये, ब्युटीपार्लर, स्पा, व्यायामशाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या व्यवसायातील लोकांची उपासमार होत असून ही दुकाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी राज्यभरातून होत होती.

सरकारने लवकरच अडचणीत असलेल्या सलून व्यवसायावर मार्ग काढण्याचे आवाहन सोमवार दि. २२ जून २०२० ला महाराष्ट्र मोहाडी नाभिक संघटनाचे नगरपंचायतचे अध्यक्ष गुणवंत घुमे पांढराबोडी, उपाध्यक्ष राजेश बेलूरकर खरबी, सचिव राजेश आंजनकर निलज, कोषाध्यक्ष संजय पापडकर, श्याम पापडकर कुशारी, नंदलाल आंजनकर निलज, धनराज शेंडे डोंगरगाव, रमेश बेलूरकर, शुभम बेलुरकर, सुरेश बेलुरकर खरबी, दिलीप उमरकर, विलास साखरकर, महेंद्र साखरकर, अनिल राऊत, मंगेश अनकर, योगेश अनकर, सीताराम वानखेडे, मोहाडी, आशिष घुमे, मनोज घुमे पांढराबोडी, देवदास दहेकर आंधळगाव, मुरलीधर उके, राजकुमार उके खुटसावरी, योगेश वाटकर, नरेंद्र सुर्यवंशी मोहंगावदेवी, संजय दहेकर यांनी मोहाडी तहसीलदार देवदास बोंबुर्डे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या.

आत्महत्या घडल्या आहेत, लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना सशर्त परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवार दि.२५ जून २०२० ला पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी येत्या आठवड्यात केशकर्तनालये सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार आज रविवार दि. २८ जून २०२० पासून केशकर्तनालये, ब्यूटीपार्लर सुरू करण्यात आल्या असून यासाठी नवी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग अशाच मर्यादित सेवा ग्राहकांना देता येणार आहेत. त्वचेशी संबंधित इतर कोणत्याही सेवा (उदा. दाढी) देण्यास परवानगी असणार नाही. दुकानदारांना ठळकपणे ही बाब प्रदर्शित करावी लागणार आहे. या व्यतिरिक्त दुकानदारांना दुकानातील कर्मचाºयांनी ग्लोव्हज, अँप्रन आणि मास्कचा वापर करणंही बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा अन्य वस्तूंचे सॅनिटायझेशन करणे बंधनकारक असणार आहे.

दुकानातील वापरला जाणारा प्रत्येक भागही दर दोन तासंनी सॅनिटाईझ करावा लागणार आहे. या व्यतिरिक्त फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा वापर बंधनकारक असणार आहे. तसंच ज्या वस्तू लगेच नष्ट करणे शक्य नाही त्या वस्तू सेवा दिल्यानंतर सॅनिटाईझही कराव्या लागणार आहे. या सर्व अटींचे दुकानदारांना पालन करावे लागणार आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे संदर्भ क्र.६ च्या आदेशान्वये जिल्हयातील केशकर्तनालय, हेयर सलून व व्युटी पार्लर या आस्थापना, दुकाने यांना पुढीलप्रमाणे अटी व शर्तीच्या आधारे रविवार दि. २८ जून २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत, पुढील आदेशापर्यंत सूरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे. केशकर्तनालय, हेअर सलून, ब्युटीपार्लर या आस्थापना, दुकाने यांनी ग्राहकांना टोकन सिस्टीम किंवा प्री बुकींग घेऊन प्रवेश द्यावा लागेल.

हेअर कट, केसांना रंग लावणे, व्हॅक्सींग, थ्रेड्रींग इ.सारख्या सेवांना परवानगी असेल. त्वचेशी संबंधित इतर सर्व सेवांना परवानगी असणार नाही. याबाबत संबंधित संचालक, दुकानदार यांनी दुकानाबाहेर दर्शनी भागावर या बाबतच्या सूचना फलक लावावा लागेल. केशकर्तनालय, हेअर सलून, ब्युटी पार्लर या दुकानात काम करणाºया व्यक्ती, कर्मचारी यांनी मास्क, ग्लोव्हज, अप्रान इ.परिधान करुनच सेवा देणे बंधनकारक राहील. केशकर्तनालय, हेअर सलून, ब्युटी पार्लरच्या संचालक, दुकानदार यांनी प्रत्येक ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्या ग्राहकाची खुर्ची सॅनीटॉईज करुन घ्यावी लागेल तसेच दर २ तासाला पूर्ण दुकान सॅनीटॉईज करुन स्वच्छता करावी लागेल. केशकर्तनालय, हेअरसलून, ब्युटी पार्लरच्या संचालक, दुकानदार यांनी एकदाच वापर करण्या योग्य टॉवेल, नॅपकीन इ.चा वापर करावा.

शक्यतो डिस्पोजेबल (युस एंड थ्रो) वस्तुंचा वापर करावा. तसेच सदर डिस्पोजेबल वस्तुंची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याची जवाबदारी संचालक, दुकानदार यांची राहिल. वारंवार वापर कराव्या लागणाºया साधनांचे, सा-ि हत्यांचे प्रत्येक ग्राहकांच्या सेवेनंतर निजंर्तुकीकरण (सॅनिटाईझ) व स्वच्छता करणे बंधनकारक राहील. केशकर्तनालय, हेअर सलून, बुटी पार्लरच्या संचालक, दुकानदार यांनी सदरील निर्देशांचे अनुपालनकरणे संदर्भात आस्थापना, दुकानात येणान्या सर्व ग्राहकांना सूचना द्यावे लागेल तसेच वरील सर्व निर्देशांचे फलक ग्राहकांच्या माहितीसाठी दर्शनी भागावर लावावा लागेल. आस्थापना, दुकानात येणाºया सर्व ग्राहकांमध्ये सुरक्षित शारिरीक अंतराचे पालन करावे लागेल तसेच आस्थापना, दुकानात उपलब्ध असलेल्या बैठक क्षमता (जागा) प्रमाणेच ग्राहकांना परवानगी देण्यात यावी. मास्क वापरणे व सॅनिटाईझरचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच बैठक व्यवस्थेत ‘दो गज की दुरी है जरुरी’ ऐवढे सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक राहील. आस्थापना, दुकानाच्या बाहेर दार्शनिक भागात हॅडवाश स्टेशन लावणे व हँड सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक राहील तसेच येणाºया सर्व ग्राहकांना हॅडवाश, साबणाने हात धुवून आस्थापना, दुकानात प्रवेश करतील, सर्व ग्राहकांनी मॉस्क, कापडाचे दुपट्टे नाक व तोंडावर घालणे बंधनकारक राहिल याची संपुर्ण जवाबदारी संचालक, दुकानदार यांची राहिल.

आस्थापना, दुकानात स्वच्छता व सॅनिटाईझ करण्याची संपुर्ण जवाबदारी संचालक, दुकानदार यांची राहील तसेच सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे तथा कोविड -१९ चा प्रादुर्भाव होणार नाही या बाबतची दक्षता घेऊन शासनाने निर्गमीत केलेल्या कोणत्याही सूचनेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता ग्राहक व दुकानदार यांना घेणे बंधनकारक राहिल. केशकर्तनालय, हेअर सलून, बुटी पार्लर या ठिकाणी मद्यप्राशन, तांबाखु, जर्दा इत्यादीचे सेवन करणे व थुंकण्यास पुर्णपणे प्रतिबंधीत राहिल असे आढळल्यास ग्राहक व दुकानदार यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, ग्राहक किंवा आस्थापना, दुकानातील कर्मचाºयांना सर्दी, खोकला, ताप किंवा या प्रकारच्या आजाराचे लक्षण असल्यास त्यांना दुकानात प्रवेश देऊ नये तसेच या बाबतची माहिती प्रशासनास द्यावी लागेल. केशकर्तनालय, हेअर सलून, बुटी पार्लर या ठिकाणी येणाºया ग्राहकांची नोंद मोबाईल क्रमांकासह नोंदवही (रजिस्टर) मध्ये नमुद करणे गरजेचे आहे.

उपरोक्त प्रमाणे घ्यावयाची दक्षता सर्व ग्राहकांचे निर्दशनास आणून द्यावी लागेल. उपरोक्त मुद्दयांनुसार केशकर्तनालय, हेअर सलून, बुटी पार्लरच्या संचालक, दुकानदार यांनी वरीलप्रमाणे परवानगीबाबत दिलेल्या अटी व शतींचे काटेकोरपणे अंमलबजावणी करुन करावी लागणार आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना, आस्थापना, दुकाने यांनी सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद द्यावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *