कोरोना काळातील समर्पित करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान

तालुका प्रतिनिधी मोहाडी : कोविड-१९ संसर्ग काळात सामान्य जनतेला मदतीचा व विविध क्षेत्रात सेवा प्रदान करणाºया योद्ध्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भंडारा जिल्हातर्फे रविवार दि. २८ जून २०२० ला करण्यात आला. देशात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. तीन महिन्यापासून सगळं विस्कळीत झाले आहे. कोरोना जेंव्हा पाय रोवला त्यावेळी अधिक फटका सामान्य जनता, रोजंदार मजूर, विस्थापित व्यक्ती आदी लोक लॉकडाऊन झाली होती. अशा लोकांना मदतीचा हात देणारे अनेक जण पुढे आले. कोरोचा उरावर संकट असताना आपले कर्तव्य समर्पित केले. अशा कठीण काळात विविध क्षेत्रात सामन्यांचा हित जपणाºया व्यतींचा सन्मान भंडारा जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आला.

यात आमदार राजू माणिकराव कारेमोरे (वरठी), मोहाडी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष महादेव माटे (आंधळगाव), मोहाडी पोलिस स्टेशनचे पोलिस ठाणेदार निशांत मेश्राम (यवतमाळ), हरदोली(झं)चे ग्रामसेवक गोपाल सुभाष बुरडे(सिपेवाडा), सरपंच आनंद मलेवार (नेरी), दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत उदारामजी थोटे (मोहाडी) यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान भंडारा जिल्हा महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष सदाशिव ढेंगे, सचिव प्रवीण तांडेकर, हरिष मोटघरे, गणेश बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष राजू बांते, मोहाडी तालुका अध्यक्ष गिरीधर ईस्तारु मोटघरे, सिराज नझीर शेख, नईम कुरेशी, नरेंद्र श्रीराम निमकर आदी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजू बांते यांनी केले तर आभार गणेश बर्वे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *