रिक्त होणाऱ्या सरपंच पदांवर ६ महिन्याची मुदतवाढ द्या

गोंदिया : तालुक्यात जुलै व आॅगस्ट महिन्यात अंदाजे ३९ सरपंच पद रिक्त होत असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रशासकाची नियुक्ती न करता सदर सरपंचपदांना पुढील सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव गोंदिया तालुक्यात सुद्धा असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी शासकीय कर्मचाºयांची नियुक्ती केली असल्याने प्रशासक नियुक्तीची फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. शिवाय अधिकाºयांवर अधिकचा कामाचा भार सुद्धा येऊ शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांना मिळणाºया सोयी सुविधा मध्ये दिरंगाई होऊ शकते. येत्या काळात शेतकºयांना विविध शासकीय योजनांसाठी ग्रामपंचायतीचे जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले असे विविध प्रकारच्या दाखल्याची आवश्यकता पडणार आहे. अशा परिस्थितीत प्रशासकांची नेमणूक करणे योग्य ठरणार नाही त्यामुळे प्रशासकांची नेमणूक करण्यापेक्षा सर्व सरपंचपदाचे सहा महिन्याक-ि रता मुदत वाढ करण्यात यावी अशी मागणी जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *