बाजार ओळीतील अतिक्रमण काढण्यात नगर पंचायत संशयाच्या भोवऱ्यात

प्रतिनिधी लाखनी : शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या बाजारओळीतील अतिक्रमण नगरपंचायत प्रशासणाणे काढणे सुरू केलेआहे. सदर महामार्ग लाखनी ते सोमलवाडा, रेंगेपार, चिखलाबोडी तुमसर मार्गे मध्यप्रदेश असा असून इंग्रजकालीन रस्ता आहे. या रस्त्याची रुंदी ५८ फुट असल्याची दिल्ली दरबारी केंद्र शासनाच्या जुन्या इंग्रज कालीन दस्तएवजाप्रमाणे यूवाको प्रापटीर्अंतर्गत या रस्त्याला मान्यता असून तसेच राष्ट्रीय महामार्गावरील दिक्षित राईस मिल व पांडव राईस मिल यांची सुद्धा युवाको मालमत्तेअंतर्गत नोंद असल्याची चर्चा जुने महसूल अधिकारी व जेष्ठ जाणकार नागरिकांत आहे.

इंग्रजांनी ५८ फुट रुंदी असलेला हा रस्ता व्यापारासाठी मध्यप्रदेशात जाण्या-येण्यासाठी राखीव ठेवले असल्याची माहिती जुन्या जाणकार जेष्ठ व्यक्ती सांगत असल्या तरी न.प. प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करून त्या अतिक्रमनाची कारवाहीत पक्षपात केल्या जात असल्याने नगरपंचायत प्रशासन संशयाच्या भोवºयात असून सदर रस्ता मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे ३० फुट रुंदीचे घेण्यात यावे असे निवेदन नागरिकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिले. जुन्या इंग्रजकालीन नोंदीनुसार ही मालमत्ता युवाको मालमत्तेअंतर्गत असून इंग्रजांनी हा रस्ता व्यापाºयांच्या दळणवळांनासाठी मध्यपरदेशात जाण्या झ्र येण्यासाठी राखीव ठेवला होता. कालांतराने शासकीय जागा असल्याने लाखनी शहरात शरणार्थी व्यवसाईकांना तात्पुरत्या स्वरूपाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लावण्यासाठी काही जागा देण्यात आली. पण व्यवसाईकांनी दुकाने लावल्यानंतर हळू हळू या रस्त्याची रुंदी कमी कमी होत गेली व आता सध्या परिस्थितीत २० फुटापेक्षाही कमी जागेत रस्ता असून आवागमन करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असतो. एकावेळी एक ट्रक जर आला तर त्याच्या समोर आणि त्या ट्रकच्या मागे लांबच लांब रांगा लागत असतात.

नगरपंचायती अंतर्गत बाजारपेठेत पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुकानांसमोर वाहनांची मोठी गर्दी जमते व दुकानांसमोर असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. सदर जागा ही शासकीय असून नगरपंचायतीने सरसकट रस्ता मध्यभागपसून दोन्ही बाजूने ३०-३० फुट रुंदी घेतल्यास केल्यास पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था ही होईल. व आवागमन करताना वाहतुकीची कोंडीही होणार नाही. या मार्गावरून तुमसर व तिरोडा तालुक्यांना जोडणारे मार्ग असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कमी वेळात व कमी तिकिटात लवकर जाणे येणे नागरिकाना सोईस्कर होईल. रस्ता न बनल्यामुळे राज्य परिवहन महामंडळ व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. लाखनी येथील बाजार लाइन परिसरात अनेक प्रकारची दुकाने असून दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात आपल्या दुकानसमोर शेड टाकून अतिक्रमण केले होते.

दुकानात आलेल्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर ठेवली जात असल्यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत होती. याचा नागरिकाना कमालीचा त्रास होत होता. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांची खूप दिवसांपासून होती. त्याचीच दखल घेत नगरपंचायत मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या नेतृत्वात नगरपंचायत कर्मचाºयासह जेसीबी च्या सहय्याने काढले जात असले तरी या कारवाईत मोठ्या प्रमाणात पक्षपात केला जात असून नगरसेवक व नगरपंचायत प्रशास नाकडून मजीर्तील लोकांना मुभा तर सर्वसामन्यावर कारवाई केली जात आहे. तसेच रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूला सारखे अतिक्रमण काढावे, पार्किंगची व्यवस्था करावी तसेच दुकानांसमोर असलेल्या वाहनांकडून रोखीने दंड वसूल करावा. अशी मागणी नगरीकांकडुन होत आहे. हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *