आणखी ७ कोरोना रूग्णांची भर

गोंदिया : कोरोना विषाणू संसर्ग झालेले नवे सात बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहे.यातील एक रुग्ण हा मुंबई येथे नौकरीला आहे तर उर्वरित सहा रुग्ण हे नागपूर येथे कोरोना बाधित आढळून मृत पावलेल्या रुग्णासोबत त्याच कंपनीत मुंडीपार औद्योगिक वसाहतीत नोकरीला आहे.सर्व रुग्ण हे २० ते ६० वर्षे वयोगटातील आहे. जिल्ह्यात हे आज सात रुग्ण नव्याने आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता ११३ वर पोहचली आहे.

गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे १३७ अहवाल प्रलंबित आहे.आतापर्यंत १०२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता १० क्रियाशील रुग्ण आहे जिल्ह्यात आढळलेले ११३ कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/ मोरगाव तालुका – ३१,सडक/अर्जुनी तालुका – १०, गोरेगाव तालुका – ४, आमगाव तालुका -१, सालेकसा तालुका – २, गोंदिया तालुका – १९, तिरोडा तालुक्यातील ३४ रुग्ण आहे आणि मुंबई येथील दोन रुग्ण आहे.

आज आढळलेल्या रुग्णामध्ये गोंदिया तालुक्यातील ६ रुग्ण तर एक रुग्ण हा मुंबई येथून आलेला आहे. गोंदियाच्या प्रयोगशाळेत कोरोना संशयित २६४० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवि ण्यात आले.त्यामध्ये ११३ रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.तर १३७ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये ५२४ आणि घरी १७८१अशा एकूण २३०५ व्यक्ती विलगीकरणात आहे.

जिल्ह्यातील १६ कंटेंटमेंट झोनपैकी सालेकसा तालुक्यातील बामणी व,पाथरी.गोंदिया तालुक्यातील मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, शेजगाव, कुंभारेनगर (गोंदिया) हे झोन वगळता उर्वरित ९ कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांना उपलब्ध सेवामध्ये शिथीलता देण्यात आली आहे. जिल्ह्यात आता क्रियाशील कंटेंनमेंट झोन सोळा असून यामध्ये गोंदिया तालुका – नवरगाव/ कला, कटंगी, परसवाडा,चुटिया, रजेगाव, गजानन कॉलनी, काटी, मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, शेजगाव, कुंभारेनगर (गोंदिया) सालेकसा तालूका -धनसुवा,बामणी व पाथरी आणि तिरोडा तालुका -तिरोडा आदी.सोळा झोनचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *