नाना पटोले यांच्या हस्ते पं.स.च्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

तालुका प्रतिनिधी साकोली : मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले या नवीन इमारतीसाठी शासनाकडून तीन कोटी ७४ लक्ष ३४ हजार रुपयाची निधी मंजूर करण्यात आली आहे. ही नवीन इमारत नवीन तहसील कार्यालयाच्या बाजूला तयार होत असून पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व विभागांची व्यवस्था या इमारतीत राहणार असून नागरिकांना सोयीचे होईल.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, जि .प. सदस्य प्रा. होमराज कापगते, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, पं.स.सभापती उषा डोंगरवार, जि.प. कार्य. अभियंता अल्पना पाटणे,उपविभागीय अभियंता उमेश ढेंगे साकोली न.प.मुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी मडावी,जि. प. सदस्य दीपक मेंढे पं.स. सदस्य लालचंद लोथे, यादवराव कापगते, संदीप बावनकुळे, राजू पालीवाल ,नेपाल कापगते उपस्थित होते २५/१५ इतर ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारती करिता एक हेक्टर जागेत इमारत बांधकामाचे क्षेत्रफळ ९९६ वर्ग मीटर इतके आहे.

या नवीन इमारतीमध्ये पंचायत समितीशी संबंधित प्रत्येक विभागाची व्यवस्था राहणार असून नागरिकांना इतरत्र न भटकता याच प्रशासकीय इमारतीत ग्रामीणांशी निगडित असलेली सर्व कामे मार्गी लागतील प्रशासकीय इमारत बांधकाम दोन वर्षात पूर्ण होणार असून साकोली येथील गड कुंभली रोडवर एकाच परिसरात एसडीओ कार्यालय तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय निर्माण झाल्याने नागरिकांना प्रशासकीय कामासाठी सोयीचे होणार असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रसंगी व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *