समाजातील शेवटच्या घटकाला अन्नधान्य किट्स पोहचवण्यात यावी- डॉ. नितीन राऊत

भं.प./ प्रतिनिधी नागपूर : उत्तर नागपूर मतदारसंघातील गोरगरीब नागरिकांना व निराधार व्यक्तिंना व मजूरांना तात्काळ किट्स पोहचवण्यात यावे असे स्पष्ट आदेश उत्तर नागपूर काँगेस कमेटी ( अनु. जाती विभाग) अध्यक्ष गौतम अंबादे द्वारा आयोजित बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात आशी नगर टेका नाका नागपूर येथे किट्स वाटप समारंभात बोलत होते. यावेळी नागपुर शहर कांग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष ठाकुरजी जग्याशी, फिलीप जैस्वाल, महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस महासचिव बेबीताई गौरीकर, सवर्ना चालकुरे, शहर महासचिव डॉ जयंत जांभुळकर, कांग्रेस कमेटी ब्लाक १३ अध्यक्ष सुरेश पाटील, अजित सिंग, उत्तर नागपुर युवक कांग्रेस उपाध्यक्ष सतीश पाली, ज्योती खोबरागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ नितीन राऊत पुढे म्हणाले कि मतदारसंघातील जनतेशी माझा संबंध हा कुटूंबा प्रमाणे आहे यामुळे त्यांची सेवा करणे हे माझे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक खोबरागडे व आभार प्रदर्शन धिरज सहारे यांनी केले.याप्रसंगी ११० लोकांना किट्स वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सलिम खान, कुणाल निमगडे, िव ज य् ा डोगरे,कमलेश हुमने गौतमी सुहास नारनवरे, सचिन वासनिक, निलेश खोबरागडे, चेतन तरारे, राकेश इखार, गोविन्द गौरे, आकाश इंदुरकर, विशाल हुमने इत्यादी लोकांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *