अअजजन्नाीीत्ता ककााप्पाडड ददककाान्नाााल्लााा अआाग्गा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : शहरातील आनंद वस्त्रालय या चार मजली प्रतिष्ठानाच्या चौथ्या मजल्यावर आज, ७ मे रोजी दुपारी तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. चार मजली या वास्तूला लागलेल्या आगीमुळे लाखांवर नुकसान झाले. मात्र मोठा अनर्थ टळला. प्राप्त माहितीनुसार, शहराच्या मुख्य रस्त्यावरील आनंद वस्त्रालयाच्या चौथ्या माळ्याला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.

दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील सगळे व्यावसायिक गोळा झाले. सदर वास्तू चार मजली असल्यामुळे काय करावे कुणालाच सुचेनासे झाले. नगरपंचायत अग्निशमन दलाला लगेच माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाची चमूघटनास्थळी पोहोचली. चमूच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली. या दुर्घटने प्रतिष्ठान चालकाने २० ते २२ लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चौथ्या माळ्यावर लागलेली ही आग नेमकी कशी लागली हे कारण अद्याप कळू शकले नाही. चौथ्या माळ्यावर सहा कुलर, दोन मोठे मोटार आणि सोलार यंत्र बसविले आहे. या आगीमध्ये हे साहित्य जळून खाक झाले. ही आग चौथ्या माळ्यावरून तिसºया माळ्यापर्यंत पाईपलाईनद्वारे खाली पोहोचली होती. मात्र दुकानाच्या आत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी घडली नाही. अग्निशमनदलाचे निखिल शहारे, सुरेश बोरीकर, दुर्योधन नेवारे, धनंजय काळबांधे यांच्या चमूने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

सालेकसा येथे फुलांच्या दुकानाला आग
सालेकसा येथील बसस्थानक परिसरातील फुलहार व फळाच्या दुकानाला आज ७ मे रोजी अचानक आग लागली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत दुकान मालक मोहन रहिले यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान भाजप सालेकसा मंडळ महामंत्री राजेंद्र बडोले यांनी घटनास्थळाची पाहणी करुन मोहन राहिले यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीलदारांची भेट घेऊन केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.