पार्टी करण्यासाठी गेलेल्या २ तरुणांचा बुडून मृत्यू

प्रतिनिधी नागपूर : उमरेड तालुक्यातील मकरढोकडा येथील जलाशयावर पार्टी करण्यासाठी गेलेल्या २ तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित गोंडाने आणि कौशिक लारोकर अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दोन्ही मृतांचे घर नागपूर शहरातील शांतीनगर परिसरात आहे. लॉकडाऊनमुळे कंटाळलेल्या काही तरुणांनी पाटीर्ला जाण्याचा बेत आखला होता. यामध्ये रोहित गोंडाने, कौशिक लारोकर, मिहीर चावला, अतुल धार्मिक, राजेश राहाटे आणि आर्यन सहारे या युवकांचा समावेश होता. लॉकडाऊनमुळे शहरात पोलिसांचा बंदोबस्त असल्याने या सर्वांनी नागपूरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेड येथील मकरढोकडा जलाशयावर जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार सर्व 6 जण जलाशयावर गेले असता त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. सर्व ६ तरुण पाण्यात उतरले असताना रोहित आणि कौशिक अतिउत्साहात पुढे निघून गेले. मात्र, पुढे पाणी खोल असल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. तेव्हा इतरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रोहित आणि कौशिक हे दोन तरुण जलाशयात बुडल्याची माहिती समजताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळ गाठले. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *