पत्रकार संघाच्या वतीने अनिल मेश्राम यांचा सत्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सडक अर्जुनी : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल मेश्राम यांचा महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका सडक अजुर्नी शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देवून सपत्नीक सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्यात. अनिल मेश्राम यांनी मुख्याध्यापक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळताच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत वेळोवेळी समाजहिताची अनेक कामे केली आहेत.

त्यांच्या या कायार्ची दखल घेत महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य सदस्य प्रा. डॉ. राजकुमार भगत, तालुका अध्यक्ष आर. व्ही. मेश्राम, सचिव बिरला गणवीर, उपाध्यक्ष प्रभाकर अल्ल्रह्ण टी२ँ१ें भेंडारकर, सहसचिव शाहीद पटेल, मुन्नाभाई नंदागवळी आदींनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार ममोहर चंद्रीकापुरे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकला डोंगरवार, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर, इंजि. अनुज मेश्राम, डॉ. अनिष्का मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.