वीज बिल समजून घेण्यासाठी आज वेबिनारचे आयोजन

प्रतिनिधी नागपूर : लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्यिक वीज ग्राहकांना विज बिलविषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व त्या संबंधातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नागपूर परिमंडलाद्वारे नागपूर व वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांसाठी वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दि. ३० जून रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत होणाºया वेबिनारमध्ये महावितरणने वितरित केलेले माहे. एप्रिल, मे व जून महिन्यातील वीज बिल बाबत ग्राहकांना माहिती घेता येईल. वेबिनार मध्ये सहभागी होण्याकरिता वीज ग्राहकांना https://bit.do/Mahavitarn_Nagpur  या लिंकवर जाऊन कॉम्प्युटर द्वारे अथवा दफ QR code द्वारे ग्राहकांना वेबिनार मध्ये सहभागी होऊन आपल्या बिलाबाबत माहिती घेता येइल. मोबाईल द्वारे सहभागी होण्यासाठी microsoft terms हे अँप डाउन लोड करावे लागेल.

ग्राहकांच्या वीज बिलाविषयीच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी महावितरणच्या वतीने लोकप्रतिनिधींचे व्हाट्सअँप ग्रुप, आठवडी बाजार तसेच महावितरणचे कार्यालय अशा ठिकाणी ग्राहक शिबीर, हेल्प डेस्क कार्यान्वित करण्यात आले असून ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर वीज बिल स्पष्ट करणारा सविस्तर मॅसेज तसेच व्हॉइस कॉलही करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून ग्राहकांच्या शंकांचे वेबिनारच्या माध्यमातून निराकरण करण्यात येणार आहे. या वेबिनार मध्ये सहभागी होऊन ग्राहकांनी वीज बिलाबत आपल्या शंकाचे निरासन करून घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे. याशिवाय https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरही ग्राहक स्वत: आपल्या वीज बिलाची पडताळणी करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *