गोंडवाना गोटूल सांस्कृतिक भवन (शिक्षा केंद्र) चे आ.राजू कारेमोरे यांच्या हस्ते भूमिपूजन

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी तुमसर : तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी समाजाचा सभागृह सांस्कृतिक भवन असावा ही मागणी कित्येक वर्षापासून आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, गोंडवाना कृती संघर्ष समिती आणि आॅल इंडिया आदिवासी पीपल्स फेडरेशन च्या वतीने करण्यात येत होती, त्याला तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय राजुभाऊ कारेमोरे यांनी स्थानिक निधीतून २१ लाख रु. सभागृहा करिता व ३ लाख रु. भरण घालण्या करिता उपलब्ध करून आपल्या शुभहस्ते भूमिपूजन करून आज शिक्कामोर्तब केला. त्यामुळे आमदार साहेबांचा सर्व आदिवासी समाजाकडून शाल श्रीफळ व पिवळा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात तुमसर तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी मोठा सभागृह झाल्यास शहरात लग्न सोहळा व इतर कार्यक्रम घेता येतील, तसेच तुमसर तालुक्यात समाज कल्याण विभाग अंतर्गत मुलींकरिता शासकीय वसतिगृह सुरू करावेत, आंबागड येथील बख्त बुलंद शाह उईके किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी माजी जि. प. सदस्य अशोक भाऊ उईके यांनी केली.

तसेच आदिवासी समाजाच्या वतीने सभागृहाची मागणी रास्त असून मोठा गोंडवाना गोटुल सांस्कृतिक भवन (सभागृह) बांधण्यात येईल, तसेच समाजाच्या समस्या सोडविण्या करिता व गोंडवाना गोटूल च्या बांधकामा करिता तसेच येणाºया अडी अडचणीला मी नेहमी आपल्या सोबत आहे, लागणाºया निधी ला सुद्धा कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी समाजाला दिली तथा गावागावात वाचनालयाचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी यश गाठावे असे प्रतिपादन राजूभाऊ कारेमोरे आमदार यांनी आपल्या संबोधनात केले. संचालन रोहित मरस्कोल्हे, प्रास्ताविकधनराज इळपाचे यांनी तर आभार राजकुमार परतेती यांनी मानले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, सोनबा अहाके, डेप्युटी इंजिनियर पिपरेवार, मीताराम उईके, बिरसा फायटर चे प्रदेशाध्यक्ष शामराव उईके, मनोहर टेकाम, इंजि. मुकेश भलावी,उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन चे सर्व पदाधिकारी, गोंडवाना कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाताई पेंदाम, सचिव दुर्गा परतेती, आॅल इंडिया आ. पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष धुर्वे, साहेबराव मरकाम, मनोज कोकोडे यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.