धान घोटाळेबाजांवर कारवाईसाठी ‘जेल भरो आंदोलन’-चरण वाघमारे

प्रतिनिधी भंडारा :- चालु वर्षामध्ये तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धान घोटाळा झाला असुन धान घोटाळयाची चौकशी करून घोटाळेबाजांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावे.यासह नागरीकांचे ३०० युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करण्यात यावे व शिल्लक वीज बिलाचे ३ हप्ते पाडुन देण्यात यावे,तुमसर-मोहाडी तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाने जाहिर केलेल दोन हजार रूपये तात्काळ देण्यात यावे, जिल्हयातील नागरीकांना रेती उपलब्ध व्हावी याकरीता रेती घाटांचे लिलाव करण्यात यावे, प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ देण्यात यावा,दुध उत्पादकांचे थकीत चुकारे तात्काळ अदा करण्यात यावा,तुमसर मोहाडी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान देण्यात यावे,तुमसर व मोहाडी शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे थकीत अनुदान तात्काळ अदा करण्यात यावे आदि मागणीकरीता येत्या १ जुलै २०२० रोजी तुमसर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ‘जेल भरो आंदोलन’ करण्यात येणार असल्याची माहिती विकास फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये २०१३-१४ ला ज्यापध्दतीने धान घोटाळा झाला व सीआयडीने तपास करून गुन्हा दाखल केला तीच परिस्थिती यावर्षी २०२० मध्ये दिसुन आली.शासनाच्या चौकशीतही बºयाच गोष्टी निष्पन्न झाल्या मात्र अद्याही दोषींवर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.यासंदर्भात आपण मागील ३ महिन्यांपासुन पत्रव्यवहार करीत माहिती मागीतली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. जावळपास ६ ते ७ धान खरेदी केंद्रावर माल न पोहचविता फक्त सात बारा चा आधार घेवुन धानाची नोंदणी करण्यात आली.ज्यावेळी आपण त्या धानाचे पंचनामे करून मोजणी करण्याची मागणी केली.तेव्हा जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आले की,धान सेंटरवर न जाता त्याची खरेदी दाखविण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष धान तिथे उपलब्ध नव्हता आणि त्याआधारे चौकशी झाली असता तुमसर व मोहाडी तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर जवळपास ७५ हजार क्विंटल धान आढळुन आलेले नाही.तरिसुध्दा शासनाने डिओ देतांना मोजणी करीता वेगळी माणसे नेमण्याची मागणी केली असता.तसे आदेश सुध्दा जिल्हा पणन अधिकाºयाच्या वतीने काढण्यात आले.मात्र त्याअगोदरच आॅन रेकॉर्डवर डिलिव्हरी दाखविण्यात आली.आणि म्हणुन अशा लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी या मागणीकरीता जेल भरो आंदोलन करण्यात येत असल्याचे वाघमारे यांनी यावेळी सांगीतले.याप्रसंगी विकास फा- ऊंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत् ा लांजेवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *