कृषी विभाचा साहित्य खरेदी गैरप्रकाराची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल

प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात कृषी विभागाचे साहित्य खरेदी प्रकरणात झालेल्या गैरप्रकार प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दखल घेऊन सचिव कृषि विभाग, मंत्रालय, मुंबई यांना निर्देशित करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.या प्रकरणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती . तक्रारीची दखल घेण्यात आल्याने या घोटाळा प्रकरणी चौकशी होवून दोषींवर नक्कीच कार्यवाही होणार आहे. जरी निवडून आलेला लोकप्रतिनिधी नसलो तरीही, जनतेचा पैसा भ्रष्टाचारात वाया जावू देणार नाही.जनतेच्या हक्कासाठी आपण नेहमीच लढत राहणार असल्याचे चरण वाघमारे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *