भंडाºयात दिवसाढवळया युवकाचा खून

प्रतिनिधी भंडारा : शहरातील शुक्रवारी वार्ड पांढराबोडी रोड परिस- रात दिवसाढवळया एका तरूणाचा खून केल्याची घटना आज दि.२९ जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घडली.सुरज यादव वय अंदाजे ३३ वर्ष रा.नागपूर ह.मु.शुक्रवारी वार्ड भंडारा असे मृतकाचे नाव आहे.मागील पंधरा दिवसातील हि दुसरी घटना असुन या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. याच महिन्यात १९ जून रोजी शहरातील हेडगेवार चौक परिसरात मोटारसायकलला कट मारल्याच्या वादातुन एका तरूणाची लोखंडी सळाखीने निर्घुन खून केल्याची घटना ताजी असतांनाच आज पुन्हा शहरात एका युवकाचा खून झाल्याने एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लोकेश कनसे यांनी पोलीस कर्मचाºयासह घटनास्थळाकडे धाव घेतली.याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंदविला असुन पुढील तपास सुरू आहे.मृतक हा गुंड प्रवृत्तीचा असुन त्याच्यावर पोलीसांत गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे येत असुन जुन्या वादातुन सुरज यादव याचा खुन झाल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *