पुन्हा एका कोरोना रूग्णाची भर: ५८ व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात, पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ८०,

प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात आज भंडारा तालुक्यातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. आतापर्यंत ५८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या ८० झाली असून २२ क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज एका रुग्णाची भर पडली असून जिल्ह्यात आता २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या ८० एवढी आहे. ५७ अहवालाची प्रतिक्षाआहे. आतापर्यंत ४११० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवि ण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ८० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर ३९७३ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

५७नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. आज २९ जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये २३ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ४५७ व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे १३९ भरती आहेत. ३४२७ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे, मुंबई व इतर राज्यातून ४३९२४ यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून ४००६८ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या ३८५६ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *