वॉटर पार्कमध्ये तरुणाला बेदम मारहाण

गोंदिया : सडक अर्जुनी येथील एक्वा अ‍ॅडव्हान्चर वॉटर पार्कमध्ये नयनपुर डूग्गीपार तरणताळ येथे बॉल पासिंग खेळत असताना झालेल्या किरकोळ वादातून बाचाबाची नंतर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेतील गंभीर तरुण पंकज नुतेंद्र बिसेन (२४) रा. कुडवा, गोंदिया याला उपचाराकरिता गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावर रविवारी मध्यरात्री तीन शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती डूग्गीपर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिंगणजुडे यांनी दिली. डूग्गीपर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सडक अजुर्नी येथील वॉटर पार्क मध्ये तुमसर आणि गोंदियातील तरुणांचे वेग वेगळे गट मौज मस्ती करण्याकरिता गेले होते.

दरम्यान स्विमिंग पूल मध्ये बॉल पासिंग खेळत असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला, बाचाबाची नंतर सदर तरुण पळून जाण्याच्या बेतात असताना तुमसरच्या तरुणांनी त्याला कार पार्किंग परिसरात बेदम मारहाण केली. यात तो जागीच बेशुद्ध पडला त्याला त्याच्या मित्रांनी उपचाराकरिता गोंदियातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.