थेट बांधावरून होणार शेतमालाची खरेदी खरेदीदार व विक्रेता संमेलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कृषि विभाग जागतिक बँक अर्थसहाय्यीत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत आज जिल्हानियोजन कार्यालय येथील सभागृहात खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजीत करण्यात आले. जिह्यात पाणी भरपूर प्रमाणात असून जिल्हामध्ये जास्त प्रमाणात भात शेती केली जाते. शेतकºयांनी भात शेती व्यतिरिक्त भाजी-पाला लागवंड करावी त्यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होईल. शेतकºयांचे उत्पन्न वाढीकरिता प्रशासन व कृषि विभाग प्रयत्न करित आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी उपस्थित शेतकºयांना केले.

संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर हे होते तर उपस्थितीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर, आत्मा प्रकल्पसंचालक उर्मीला चिखले, उपविभागीय कृषि अधिकारी अविनाश कोटांगले व पद्माकर गिडमारे व विविध कंपन्यांचे खरेदीदार रवि पाटील, प्रशांत मोसमकर समृद्धी आॅरगॅनिक, तुषार वरूनगावकर घरकुल मसाले, सौरभ यादव, प्रफुल बांडेबुचे, तुषार मशरूम, बंडू बारापात्रे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकºयांच्या शेतमालाची थेट या कंपन्या बांधावरून खरेदी करून शेतकºयांना चांगला मोबदला देवून त्या शेतमालाला बाहेर देशात विक्री करिता पाठविण्याची व्यवस्था या कंपन्या करतात.

शेतकºयांनी जास्तीत जास्त उत्पादन व उत्पन्न घ्यावे, असे आत्मा प्रकल्प संचालक उर्मीला चिखले यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शांतीलाल गायधने नोडल अधिकारी स्मार्ट यांनी केले तर सुत्र संचालन अनिल जबंजार यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.