तुकाराम मुंढे यांनी बळकावले सीईओ पद; नितीन गडकरींची केंद्रात लेखी तक्रार

प्रतिनिधी नागपूर : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारकडे लेखी तक्रार केली आहे. नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भातल पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून तुकाराम मुंढे यांनी सीईओ पद बळकावल्याचं म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी स्मार्ट सिटी घोटाळा प्रकरणात केंद्र सरकारला हे पत्र लिहिलं आहे. ज्यात ते म्हणतात, ह्लनागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनचे सीईओ तुकाराम मुंढे यांचे वर्तन हे अवैध आणि घोटाळेबाज आहे. हे सीईओपदही त्यांनी बळकावलं आहे या आशयाचा मजकूर या पत्रात आहे. नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला तेव्हाच त्यांनी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडच्या सीईओपदाची जबाबदारी बेकायदा बळकाव ली असा आरोप गडकरींनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *