राज्यात २४ तासांत आणखी ६७ पोलीस करोना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे समजल्या जाणाºया वैद्यकीय कर्मचाºयांसह पोलिसांना देखील करोनाचा संसर्ग अधिकच होत असल्याचे दिसून येत आहे. मागील चोवीस तासांत राज्यात आणखी ६७ पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस १ हजार ९७ पोलिसांवर करोनाचा उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ५९ वर पोहचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *