सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातील आरोपीला २ वर्षाची शिक्षा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिध्द झाल्याने न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली. राम उर्फ बब्बू संतवानी वय अंदाजे ३२ वर्षे रा. नेहरु वार्ड मेंढा भंडारा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भंडारा शहरातील मेंढा येथील प्रकाश जयराम धुर्वे वय ४३ वर्षे हा मजुरीचे काम करीत असुन त्याची पत्नी सुध्दा मजुरीचे काम करते. त्याला चार मुली आहे. त्याच्या घरा शेजारी राहणारा बब्बु मुरलीधर संतवानी वय अंदाजे ३२ वर्षे याचे त्याच परिसरात श्रीराम किराणाचे दुकान आहे. दि. ७ जुन २०१८ रोजी सकाळी ७ वा. दरम्यान फियार्दी हा कामाला जात असतांना त्यांचा मित्र प्रकाश धुर्वे हा घरा समोरील रस्त्यावर दिसला असता चल ह्यफिरुन येवू असे बोलला.ह्ण तेव्हा फियार्दी भृशुंड गणेश मंदीराकडे आले. व तेथे थोडा वेळ थांबुन घराकडे जात असता बब्बू संतवानी याचे दूकानात जावून मूलीसाठी बिस्कीट चे पॅकेट उधार मागीतले असता आरोपी बब्बू संतवानी याने उधारी देत नाही असे बोलुन प्रकाशला शिवीगाळ करीत त्याचे छातीवर, तोंडावर, डोक्यावर लाथीने मारहाण करीत त्याला भिंतीवर ढकलले.

त्या मारहाणीत प्रकाश बेशुध्द पडला.घटनेची येथे अपराध क्रमांक ४२२/२०१८ कलम ३०२,३४ भादवी सहकलम ३(२) (५) अ. जा. ज. अ. प्र. का अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला. भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड भंडारा यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन तपासाला सुरुवात केली. प्रत्याक्षदर्शी साक्षदार यांना विचारपुस करुन आरोपीस अटक करण्यात आली.अधिक तपासा अंती आरोपी विरुध्द योग्य व सबळ पुरावे मिळुन आल्याने आरोपी विरुध्द कलम ३०२,३४ भादवी सहकलम ३(२) (५) अ. जा. ज. अ. प्र. का अन्वये दोषारोपत्र तयार करुन कोर्टात सादर केले.

सदर गुन्हयाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश तथा अतिरीक्त विशेष सत्र न्यायाधिश श्री. सि. एल. देशपांडे यांचे न्यायालयींन कक्षात चालविण्यात आली. सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता रमाकांत खन्नी यांनी योग्य बाजु मांडत साक्षीदार तपासले. आरोपी विरोधात असलेल्या पुराव्यांचे आधारे आरोपी राम उर्फ बब्बू संतवानी वय अंदाजे ३२ वर्षे रा. नेहरु वार्ड भंडारा याला दोषी ठरवुन सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली न्यायालयाने कलम ३०४ (सस)भांदवी मध्ये २ वर्षे सश्रम कारावास १० हजार रुपए माहिती होताच पोलीसांनी दंड ,द्रव्यदंड न भरल्यास ६ महिने घटनास्थळाकडे धाव घेत जखमी प्रकाशला अ‍ॅम्बूलंस मध्ये टाकुन जिल्हा रूग्णालयात नेले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. तक्रारी वरुन पोलीस स्टेषन भंडारा साधा कारावासाची शिक्षा सुनावली . दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणुन मृतक प्रकाश जयराम धुर्वे यांचे पत्नीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.