भाजपा निमंत्रित सदस्य म्हणून डॉ. उल्हास फडके यांची नियुक्ती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात घोषित झालेल्या नवीन प्रदेश अभ्यास गटावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. कार्यकारिणीत निमंत्रित सदस्य म्हणून डॉ. उल्हास फडके यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. उल्हास फडके भाजपा शिक्षक आघाडी चे प्रदेश सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत व शिक्षक चळवळीत सक्रिय कार्य मागील ४० वर्षापासून अविरत करीत आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्याक्ष व नागपूर विभाग अध्यक्ष इत्यादी जवाबदाºया त्यांनी समर्थ पणे सांभाळ्या आहेत.

डॉ. फडके, महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावर गठीत महाराष्ट्र जल व शिंचन आयोगाचे सदस्य होते, तसेच ११ व्या पंचवार्षिक योजनेच्या मसुदा समितीचे सदस्य म्हणून सुद्धा काम पहिले आहे. सध्या ते गोडया पाण्यातील मत्स्य व्यवसाय संबधी प्रस्तावित कायद्याच्या त्यानी पाणी व पर्यावरण या विषयावर प्रचुर लेखन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे केंद्रातील आणि भाजपा शिवसेनेचे राज्यातील या डबल इंजिन सरकारची कामगिरी योजना प्रभाविपणे जनतेपर्यंत पोचविण्यात डॉ. फडके निश्चितच यशस्वी होतील. या नियुक्ती बद्दल डॉ. उल्हास फडके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. डॉ. उल्हास फडके भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य यांचे भंडारा जिल्हा भाजपा शिक्षक आघाडी व जनता शिक्षक महासंघ भंडाºयातील सर्व पदाधिकाºयांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.