शहरातील सिंगलटोली परिसरात अस्वलाचा तीन तास धुमाकूळ

प्रतिनिधी गोंदिया : शहराच्या गजबजलेल्या सिंगलटोली परिसरातील भरवस्तीत मंगळवारच्या मध्य रात्री अस्वल आढळल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भीती पसरली होती. अस्वलाने तब्बल तीन तास या परिसरात धुमाधुळ घातला. याची माहिती वनविभाग व पोलिसांना मिळताच वनविभागाचे एक पथक घटनास्थळी दाखले झाले. गोंदिया शहरातील सिंगलटोली परिसरात अस्वलाचा तीन तास धुमाकूळगोंदिया शहरातील सिंगलटोली हे परिसर मुंबई- हावडा रेल्वेमार्गाच्या बाजूला असल्याने या रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वेगाड्याची ये-जा असते. तेव्हा याच रेल्वेरुळावर अस्वलाने ठाण मांडल्याने अस्वलाच्या जीवितास धोका असल्याने वनविभागाच्या पथकाने रेल्वेरुळावरून अस्वलाला पळवून लावले. त्यानंतर अस्वलांनी आंबेडकर वार्डात धाव घेतली. तबल १० तासाच्या अथक प्रयत्तनानंतर सकाळी अस्वलाला जेरबंद करण्यात वनविभागाच्या बचाव पथकाला यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *