आज आणखी ६ बाधीत रुग्णांची भर

प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे.आज १ जुलै रोजी ६ जणांना कोरोना संसगार्ची बाधा झाल्याचा अहवाल गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे.यातील ४ रुग्ण गोंदिया तालुका,प्रत्येकी एक रुग्ण हा सालेकसा आणि सडक/अर्जुनी तालुक्यातील आहे.हे सर्व रुग्ण २० ते ६० वर्षे वयोगटातील आहे.आज दोन रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.हे रुग्ण तिरोडा तालुक्यातील आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.आतापर्यंत बाधित रुग्णाची संख्या १३१ झाली आहे.यात क्रियाशील रुग्ण २८ आहे गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे ३७४ अहवाल प्रलंबित आहे.आतापर्यंत १०४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.

जिल्ह्यात आता २८ क्रियाशील रुग्ण आहे प्रयोगशाळेत कोरोना संशयित ३२१३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यामध्ये १३१ रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.तर ३७४ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये ३३६ आणि घरी १३६० अशा एकूण १६९६ व्यक्ती विलगीकरणात आहे. क्रियाशील कंटेंनमेंट झोन बारा असून यामध्ये गोंदिया तालुका – मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, शेजगाव,पारडीबांध कुंभारेनगर (गोंदिया) सालेकसा तालूका – पाऊलदौना व पाथरी,तिरोडा तालुका -तिरोडा (सुभाष वार्ड) आणि सडक/अजुर्नी तालुका -राका,सौंदड व पाउलदौनाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *