पशुखाद्याने भरलेल्या ट्रकमधून दारू तस्करी

प्रतिनिधी नागपूर : गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे शहरातील कोराडी येथे नाकेबंदी लावण्यात आली होती. संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी पशुखाद्य भरलेला एक ट्रक थांबवून झडती घेतली. या कारवाईत् ा ५१ लाखांचा दारूसाठा आढळून आला आहे. हा दारूसाठा मध्यप्रदेशातून दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात पोहोचवण्यात येत माहिती समोर आली आहे. नागपूरमध्ये एका कारवाईत ५१ लाखांचा दारूसाठा आढळून आला आहे. तब्बल तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता अनलॉकची प्रक्रिया देशभरात सुरू झाली आहे. मात्र अद्याप सर्व जिल्ह्यांच्या सीमेवर पोलिसांची नाकेबंदी कायम असल्याने दारू तस्करांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

पोलिसांची नजर चुकवून दारू तस्करी करण्यासाठी आता तस्करांनी नवनवीन फंडे शोधायला सुरुवात केल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत् ा पशु खाद्य भरलेल्या ट्रकमध्ये दारूचे तब्बल सहाशे बॉक्स आढळून आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ५१ लाख रुपये इतकी आहे. हा दारूसाठा मध्य प्रदेशातून चंद्रपूरला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *