साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ.अशोक कापगते यांची नियुक्ती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार ज्या पदाधिका-यांना तीन वषार्पेक्षा अधिक कालावधी झालेला आहे, अशा पदाधिका-यांच्या जागी निवडणुकीच्या मार्फत किंवा सर्व सहमतीने नवीन पदाधिका-यांची नियुक्ती करावे असे राष्ट्रीय धोरण शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात ठरवण्यात आले. त्यानुसार राहुल गांधी यांच्या जागी मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली. त्या नुसारच राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर तसेच तालुका पातळीवर बदल करण्यात आले. त्यानुसारच नुकत्याच साकोली तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ.अशोक कापगते माजी जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य यांची नियुक्ती एकमताने करण्यात आली.

नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार मोहन पंचभाई जिल्हा अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार साकोली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी उच्चशिक्षित, सुस्वभावी व सर्वांना घेऊन चालणारे नेतृत्व म्हणूनअशोक कापगते यांची नियुक्ती करण्यात आली. येत्या २०२४ मध्ये विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये साकोली तालुका हा नाना पटोले यांचा गृह जिल्हा व गृह तालुका असल्यामुळे साकोली तालुक्याचे काँग्रेस कमिटीच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. त्यामुळेच काँग्रेसचे खेड्यापाड्यात व सर्व जाती-धर्माच्या लोकांना संघटित करण्याकरिता व एकत्र करण्याकरिता अशोक कापगते त्यांची नियुक्ती ही काँग्रेस पक्षासाठी एक संजीवनी ठरणार आहे.

डॉ.अशोक कापगते यांच्या नियुक्ती बद्दल नाना पटोले, मोहन पंचभाई, गंगाधर जिभकाटे, जिल्हा परिषद अध्यक्ष समाज कल्याण सभापती, रमेश पारधी शिक्षण सभापती, सौ.छायाताई पटले या सर्वांनी डॉ.अशोक कापगते यांना शुभेच्छा दिल्या आहेत तर शेंदूरवाफा शहर काँग्रेसचे अध्यक्ष चुन्नीलाल बोरकर, नरेश नगरीकर, मोतीराम पाटील कापगते, नरेश करंजेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.